Type Here to Get Search Results !

ट्रेलर - ॲक्टीवा अपघात; विस्तार अधिकारी मधुकर सोंडकर यांचा मृत्यू


माणगांव ( वार्ताहर ):

माणगांव शहरानजीक झालेल्या  ट्रेलर आणि ॲक्टीवा अपघातात ॲक्टिवा मोटारसायकलवरील मधुकर सोंडकर यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी माणगांव पोलिस स्टेशन हद्दीतील  पाणोसे नदीवरील पुल ते गारवा हॉटेल यांच्यामध्ये असणाऱ्या वळणावर हा अपघात झाला.

सविस्तर वृत असे की, 
मोटारसायकलस्वार मधुकर सोंडकर हे आपल्या ॲक्टिवा स्कुटी क्रमांक MH066 F4038 वरून साधारण 9.30 ते 10 वाजताच्या सुमारास माणगांवकडे जात असताना त्यांचा माणगांव दिशेकडे जाणाऱ्याच ट्रेलर क्रमांक MH.46.H.1174 या ट्रेलर बरोबर धडक झाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रेलर फोकलान घेऊन वाहतूक करत असताना पानोसे पुलाकडून माणगांवच्या दिशेने येताना असणाऱ्या अवघड वळणावर हा अपघात झाला आहे. अपघातात सोंडकर यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

मधुकर सोंडकर हे माणगांव तालुक्यातीलच हरवंडी गावचे रहिवासी असून ते सध्या महाड तालुक्यात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. अचानक झालेल्या या अपघाती मृत्युमुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त केलं जात आहे. 

जर पाहिले तर या ठिकाणी कायम अपघात होत असल्याचे पाहायला मिळते. याचे कारण जरी वाहन चालकांच्याकडून होणारी चुकी जेवढी असते तेवढच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत देखील असल्याचे नागरिकांकडून बोलण्यात येत आहे. समोरून येणारे वाहन या गवतामुळे दिसत नाही. एमएसआरडीसीच्या अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याचे देखभाली दुरुस्ती कडे लक्ष देण्यात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असून यातून अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. सोंडकर यांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे उपचारासाठी आणण्यात आले पण आधीच त्यांची प्राणज्योत मावळली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयात तसेच घटनास्थळी डीवायएसपी सुर्यवंशी तसेच पोलिस निरीक्षक एन बी बोऱ्हाडे यांनी धाव घेतली. पोलिसांनी ट्रेलर ताब्यात घेतला असून, चालकाची चौकशी सुरू आहे.

Post a Comment

0 Comments