रायगड दि. 18:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही. त्यांनी तातडीने दि. 19 ऑक्टोबरच्या आत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु असून मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या पात्र मतदारांची आतापर्यंत नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांनी तात्काळ नाव नोंदणी करावी. दि. 19 ऑक्टोबरच्या रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नागरिकांकडून प्राप्त अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येणार आहेत. या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आवर्जून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन श्री.जावळे यांनी केले आहे.
वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरीकांनी 'मतदाता सेवा पोर्टल' https&//voters.eci.gov.in/ आणि 'वोटर हेल्पलाइन अॅप' यावर ऑनलाइन सुविधाचा वापर करुन 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याकरीता नमुना क्र.6 च्या अर्जाव्दारे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments