Type Here to Get Search Results !

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले उज्वल यश

 शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या युवा महोत्सवामध्ये विविध स्पर्धा प्रकारात उज्वल यश प्राप्त केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक रावेरकर यांनी दिली आहे. कोलाड येथील श्री नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात संपन्न झालेल्या या युवा महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयाच्या संघातील सागर ज्ञानदेव मांढरे याने तालवाद्य या प्रकारात उत्कृष्ट मृदुंगवादन सादर करून रायगड विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच, अर्चना हरिश्चंद्र रेवाळे या विद्यार्थिनीने मेहंदी डिजाइन मध्ये द्वितीय व श्रावणी अविनाश शिंदे या विद्यार्थिनीने कोलाज या प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त करून मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये उज्वल यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ दीपक रावेरकर, उपप्राचार्य प्रा सुनील बलखंडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा स्नेहल कांबळे, डॉ रवींद्र सोमोशी, डॉ सुदर्शन दवणे व प्रा सुनील गवळी यांचे विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले.. उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. संतोष काळे, उपाध्यक्ष ॲड. विनोद देशमुख, सचिव श्री अशोकबंधू देशमुख, खजिनदार श्री किशोर मोरे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य आदींनी विशेष अभिनंदन करून पुढील फेरीसाठी त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments