पोलादपूर संदिप जाबडे
पोलादपूर तालुक्यातील शिवसेना संपर्क कार्यालयात मंगळवार 6 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुषमा गोगावले, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलिमा घोसाळकर, शिवसेना महिला महाड तालुका प्रमुख सपना मालुसरे, शिवसेना महिला तालुकाप्रमुख सुवर्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष बळकटीकरणाच्या उद्देशाने महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
शिवसेना पक्षाने महाड विधानसभेसह पोलादपूर तालुक्यामध्ये महाड विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे जनतेसमोर मांडणे गरजेचे असल्याचे वक्तव्य यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केले. शासनाच्या महिलांसाठी असणाऱ्या योजना, बचत गटांसाठी मिळणारे अर्थसहाय्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या योजना ह्या जनतेपर्यंत कशा पोहोचतील यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहायचे आहे असे आवाहन यावेळी उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना चंद्रकांत कळंबे यांनी केले. महिला सक्षमीकरणासाठी ज्या गोष्टीची गरज असेल त्या गोष्टींची पूर्तता करण्याचा आम्ही सर्वोत्तोपरी प्रयत्न करू, आपण येणाऱ्या निवडणुकीत भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असे आश्वासन सुषमाताई गोगावले यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी माधुरी महेंद्र विचारे तालुका सहसंपर्कप्रमुख, जान्हवी लक्ष्मण मोरे उपतालुकाप्रमुख, पुष्पा पाटोळे वार्ड प्रमुख, वैष्णवी बेलोसे वार्ड प्रमुख, रूपाली देवरुखकर उपशाखाप्रमुख,सुमन महाडिक उपशहर प्रमुख, सिद्धीका लोखंडे उपशहर प्रमुख, रश्मी पवार वॉर्ड प्रमुख, संगीता चिकणे शाखाप्रमुख, दिपाली शिंदे वार्ड प्रमुख, अर्चना पालकर वॉर्ड प्रमुख, रंजना दिलीप सावंत वार्ड प्रमुख, साक्षी अभय पालकर शिवदूत, निकिता नितीन पालकर शिवदूत , कविता आमले शाखाप्रमुख, अनिता पवार शिवदूत, वंदना गायकर शिवदूत, माया साळवी उपशाखाप्रमुख, संगीता चिकणे वार्ड प्रमुख, नयना चिकणे शिवदूत, अनिता नरे उप वॉर्ड प्रमुख, कल्पना बंडारंग उप वॉर्ड प्रमुख, नंदा शेलार शिव दूत, वैशाली पवार वॉर्ड प्रमुख, अंजना दरेकर उपवॉर्ड प्रमुख, अर्चना पालकर शाखाप्रमुख, वंदना सावंत बूथ प्रमुख, दर्शना सावंत शिवदूत, छाया सावंत उपवॉर्ड प्रमुख, संगीता तुर्डे वार्ड प्रमुख,वैष्णवी बेलोसे, रसिका घाडगे, पूनम कदम, मनीषा शेलार, वनिता मोरे, प्राची सुर्वे, विकिता सुतार, मनीषा पार्टे, लता पार्टे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष सोनाली गायकवाड,नगरसेविका अस्मिता पवार,नगरसेविका शिल्पा दरेकर, गीता दळवी आदी उपस्थित होत्या. नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी सुषमाताई गोगावले यांनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments