महाड पंढरपूर रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर
महाड विशेष प्रतिनिधी मिलिंद माने
राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून चालू असलेल्या महाड पंढरपूर रस्त्यावरील काम करणाऱ्या पि .डी . इन्फ्रा. प्रायव्हेट. लिमिटेड या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र पाहण्यास मिळत असून कामगार सुरक्षेची ऐशी की तैशी होत असताना कामगार सुरक्षा मंडळ मात्र कोणतीही दखल घेत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे
महाड पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग खात्याअंतर्गत राजेवाडी फाटा ते वरंध पर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणातून काँक्रीट करण्याचे काम पी.डी.इन्फ्रा .प्रायव्हेट.लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे मात्र कंपनी कडून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तर सोडाच मात्र रस्त्यावर सिमेंट काँक्रीट चे काम करणाऱ्या कामगारांना कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती उपकरणे देत नसल्याचे या कामावर काम करणाऱ्या कामगारांमधून दिसून येत आहे
महाड पंढरपूर रस्त्यावरील भोराव गावाजवळ पी.डी.इन्फ्रा .प्रायव्हेट.लिमिटेड या कंपनीकडून नव्याने पुलाचे बांधकाम चालू आहे मात्र या ठिकाणी पुलाचे काम करणारे कामगार मुलाचे काम चालू असताना सावधानतेच्या दृष्टिकोनातून व सुरक्षेसाठी या कामगारांना कोणत्याही प्रकारचे हेल्मेट पायात बूट हातात ग्लोज यासह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना या कंपनीकडे नसल्याने या ठिकाणी काम करणारे कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी जीवावर उदार होऊन काम करीत असल्याचे पाहण्यास मिळते मात्र याबाबत कंपनी व्यवस्थापन अथवा राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी कोणतीही दखल घेत नाहीत अथवा याबाबत विचारले असता कोणीही उत्तर देण्यास तयार नसल्याने कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र या निमित्ताने पहावयास मिळत आहे
Post a Comment
0 Comments