Type Here to Get Search Results !

मोरे महिला महाविद्यालयात 'सर्प दिना'निमित्त मार्गदर्शन

 मोरे महिला महाविद्यालयात 'सर्प दिना'निमित्त मार्गदर्शन

सह्यादी वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सागर दहिबेकर यांचे अभ्यासपूर्वक मार्गदर्शन


रोहा रुपेश रटाटे

एम.बी.मोरे फाउंडेशनचे कला वाणिज्य विज्ञान महिला महाविद्यालय धाटाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएनएस) विभाग आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रायगड यांनी संयुक्तीकपणे जागतिक सर्पदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दि १८/०७/२०२४ रोजी मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले. 

दरवर्षी १६ जुलै हा 'जागतिक सर्प दिन' म्हणून साजरा केला जातो. सापांच्या विविध प्रजातींविषयी जनजागृती करण्यासाठी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रायगड या संस्थेमार्फत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएनएस) विभागातर्फे विद्यार्थ्यांना तज्ञांनी माहिती दिली. सापाच्या विविध जाती, त्यांचे खाद्य, सापांच्या जातींचे संवर्धन यावर मार्गदर्शन केले. ही संस्था रायगड जिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग म्हणूनही कार्यरत आहे त्यामुळे मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित उद्भवणाऱ्या आपत्ती पासून विस्तळीत होणारे मानवी जीवन तसेच वन्य जीवन यांचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले.

सह्याद्री वन्यजीव संस्थेचे श्री सागर दहिंबेकर, श्री आदेश पाटेकर, श्री प्रयाग बामुगडे ,श्री शुभम सणस, कु श्वेता विश्वकर्मा ,श्री संकेत पाटील, श्री ओंकार महाडिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील 74 तर महिला महाविद्यालयीन 34 विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख  प्रा. मयुर पाखर आणि आभारप्रदर्शन प्रा. अक्षता ठाकूर यांनी केले.

Post a Comment

0 Comments