Type Here to Get Search Results !

अंधेरी येथील मरोळच्या आर्या गोल्ड कंपनीला राज पार्टे यांचा मनसे दनका

प्रतिनिधी सिताराम कळंबे


 महाराष्ट्रीयन' असा ठळक उल्लेख करत मॅनेजरच्या रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती.   मनसे नेते राज पार्टे यांनी 'आर्या गोल्ड'कंपनीच्या मालकाची भेट घेऊन त्याला खडसावले. बंटी रुपरेना असे या अमराठी मालकाचे नाव आहे. 'नो महाराष्ट्रीयन'असा इंग्रजीमध्ये स्पष्ट उल्लेख करणाऱ्या कंपनीने मराठीत आपला माफिनामा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्राला उद्देशून त्याने ही माफी मागितली आहे. मी बंटी रुपरेना,आर्या गोल्ड कंपनीचा मालक आपल्या सर्वांची माफी मागतो, असे त्याने म्हटले. 

आर्या गोल्ड कंपनीकडून मॅनेजर पदासाठी देण्यात आलेली जाहिरात शिकाऊ मुलीने पोर्टलवर अपलोड केली. यावेळी तिच्याकडून चुकून नॉन महाराष्ट्रीयन असा उल्लेख केला गेला. यामध्ये आम्ही लगेच सुधारणा केली आणि तो शब्द लगेच हटवण्यात आल्याचे मालक बंटी रुपरेनाने म्हटले. यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. झालेल्या प्रकाराबाबत मी मालक या नात्याने सर्व महाराष्ट्राची माफी मागतो, असे बंटी रुपरेनाने आपल्या माफिनाम्यात म्हटले आहे. मराठी बाणा मराठी स्वाभिमान मराठी आस्मितेला डाग लावला तर राजसाहेबाचे महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही. असे मनसे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments