विधानसभा निवडणुकीचा पारा आता भर पावसात हळू हळू चढू लागलेला आहे. मागील विधानसभेचा कालावधी संपत असल्यामुळे साधारण ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होणार असा अंदाज वर्तविला जात आहे. विधानसभा निवडणूक 2024 ला होणार हे जवळपास निश्चित असताना श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे कुटुंबातील कोणाला उमेदवारी मिळवून निवडणूक लढण्याची संधी भेटणार याकडे मतदारसंघात चर्चा सुरू झालेली पाहायला मिळत आहे.
आपण जर पाहिलं तर, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदार संघ म्हणजे सुनील तटकरे यांचा बाले किल्लाच! यापूर्वी स्वतः सुनील तटकरे त्यानंतर २०१४ मध्ये त्यांचा पुतण्या अवधूत तटकरे, २०१९ मध्ये मुलगी अदिती तटकरे याच मतदार संघातून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. सांगायचा मुद्दा हा की येथील मतदारांची नाळ तटकरे यांनी चांगलीच ओळखली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर देखील तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून २५ हजारांहून अधिकच मताधिक्य मिळविल होत. त्यामुळे त्यांचा पराभव या विधानसभा क्षेत्रामध्ये करणे खूप कठीण काम आहे.
सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जिंकत विधानपरिषदेत आमदार होते. विधान परिषदेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे आता त्यांची पुढील कारकीर्द कशी असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे श्रीवर्धन मतदारसंघातून मागे विजयी झालेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचा हा मतदार संघ आहे. आता हा मतदारसंघ निवडणुकीसाठी तटकरेंना सोपा असल्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी यावेळी तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे यांना मिळणार की त्याचे पुत्र अनिकेत तटकरे यांना या मतदार संघातून उमेदवारी मिळणार या बाबत सगळ्यांना उत्सुकता लागून आहे.
Post a Comment
0 Comments