Type Here to Get Search Results !

पोलादपूर नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक पदी शिवराज पार्टे यांची बिनविरोध निवड

 

पोलादपूर सखाराम साने
    पोलादपूर नगरपंचायत कार्यालय येथे २९ जुलै २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवराज पार्टे यांची स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झालेली आहे.
        पोलादपूर नगरपंचायतचे माजी नगरसेवक संतोष चव्हाण यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा अडीच वर्षानंतर राजीनामा दिल्यानंतर नगरपंचायत कार्यालय येथे निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला असून पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ ज्ञानोबा बानापुरे यांनी काम पाहिले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  शिवराज पार्टे यांची स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे शिवराज पार्टे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत असून पार्टे हे नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात ते पोलादपूर पत्रकार संघाचे देखील अध्यक्ष आहेत. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हनुमंत नाना जगताप ,महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, पोलादपूर तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, विरोधी पक्षनेते दिलीप भागवत,शहर प्रमुख निलेश सुतार, शहर संघटक अमोल भुवड, नगरसेवक स्वप्निल भुवड, निखिल कापडेकर, नगरसेविका श्रावणी शहा, सानवी गायकवाड, तेजस्वी गरुड, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कदम, तालुका संघटिका अश्विनी गांधी,युवा सेनेचे अमरदीप नगरकर, संतोष चिकने,  ,प्रसन्न बुटाला,महेश दरेकर , कोंढवी विभाग प्रमुख मंगेश मोरे,माजी सरपंच प्रदीप नरे, सरपंच दिपक पवार यांच्यासह अनेकांनी शिवराज पार्टे यांना शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments