Type Here to Get Search Results !

नुकसान भरपाईसाठी खेड मनसेचे निवेदन

नुकसान भरपाईसाठी खेड मनसेचे निवेदन

विशेष प्रतिनिधी : मिलिंद माने 

खेड : खेड शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांसह नागरिकांना अद्यापही गतवर्षातील नुकसान भरपाई मिळाली नाही. ही नुकसान भरपाई तातडीने द्यावी, यासाठी मनसेचे शहराध्यक्ष ऋषीकेश कानडे यांच्या नेतृत्वाखालील तहसीलदार सुधीर सोनावणे यांना निवेदन दिले आहे. येत्या ८ दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

खेड शहरात २०२३ मध्ये आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांची अपरिमित हानी झाली. नागरिकांनाही मोठा फटका बसला होता. अद्यापही पूरग्रस्त नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. या पुरग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भावना खेड मनसेने व्यक्त केली आहे.

मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, उपतालुका अध्यक्ष गणेश सुर्वे, शाखाध्यक्ष सुकवली विशाल सागवेकर,महाराष्ट्र सैनिक अविनाश वैद्य, प्रशांत बारटक्के आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments