मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, उन्हाळ्यात लावण्यात येणारे वणवे, दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर, वातावरणातील ओझोन वायूची कमी होणारी तीव्रता यामुळे झालेली जागतिक तापमानवाढ या बाबी लक्षात घेता झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे ही भविष्यकाळाची गरज बनली आहे. हीच बाब लक्षात घेता व झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरण पोषक संदेशाची अंमलबजावणी तुर्भे येथे अध्यक्ष सुनिल शंकर साळवी यांच्या संकल्पनेतून करण्यात आली. पोलादपूर तालुक्यातील महात्मा फुले नगर तुर्भे बुद्रुक येथे शनिवार २२ जून २०२४ रोजी बौद्धजन सेवा संघ तुर्भे बुद्रुक यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. मुंबई व ग्रामीण समितिच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत ५० ते ६० वृक्षांचे वृक्षारोपण केले. यावेळी अध्यक्ष सुनिल साळवी, सचिव सचिन साळवी,मार्गदर्शक आदेश साळवी, खजिनदार विशाल साळवी, सुमेध साळवी, सागर साळवी,ग्रामीण अध्यक्ष विठोबा साळवी, ग्रामपंचायत सदस्य राजेश साळवी, सुदेश जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणे हेच आमचे उद्दिष्ट असून यापुढेही वृक्षारोपणाचे हाती घेतलेले कार्य सुरूच ठेवू अशी प्रतिक्रिया एका खासगी बहिणीशी
बोलताना दिली.
Post a Comment
0 Comments