पोलादपूर नगरपंचायतीच्या हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत उंबरकोंड पार्टेकोंड रस्त्यालगत ७२० सदनिकांचा प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत व म्हाडाच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्याच्या कामाचे भुमिपूजन शुक्रवार १० मे २०२४ रोजी संपन्न झाले. प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक संदीप पालकर यांनी सपत्नीक भुमिपूजन केल्यानंतर संदीप पालकर यांच्या हस्ते कुदळीने खणून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित प्रकल्प धारकांना संबोधित करताना १२ लाखांमध्ये लाभार्थ्यांना सदनिका उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्याची तसेच रेरा च्या नियमानुसार ११ हजारांचा चेक जमा करण्याची आवश्यकता असल्याची माहिती प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक संदीप पालकर यांनी दिली. प्रकल्पाचे प्रमुख संचालक हनुमंत सावंत यांनी कोरोनापूर्वी या कामाची सुरूवात करण्याचा मानस असताना तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प दोन वर्षे लांबला असून १८ ते २४ महिन्यांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगितले. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत २०९ लाभार्थ्यांचे अर्ज पूर्ण असून उर्वरित सदनिकांसाठी अर्ज भरून घेण्याचे काम सुरू केले जाणार आहे. नव्या अर्जदारांमध्ये कागदपत्रांची पूर्तता व अकरा हजाराचा चेक देणाऱ्यांना प्राधान्याने संधी मिळण्याची शक्यता असल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित नरवीर रेस्क्यू टीमचे संस्थापक रामदास कळंबे यांनी प्रकल्पाला शुभेच्छा देत प्रकल्पाच्या उभारणीत आमदार भरत गोगावले यांचे सहकार्य मिळेल अशी ग्वाही यावेळी दिली.
यावेळी प्रकल्पाचे प्रमुख संचालक हनुमंत सावंत, संदीप पालकर, रामदास कळंबे, मच्छींद्र पाटील, विनोद म्हात्रे, मनोहर चोपडे, ललित बेंडखळे, श्रीकांत पोतदार, तळेकर,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments