Type Here to Get Search Results !

रायगड आणि कोकणच्या विकासासाठी सुनिल तटकरे यांना निवडून द्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड : राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील प्रचार रविवारी थंडावला. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील तटकरे यांना रायगड आणि कोकणच्या विकासासाठी निवडून द्या असे आवाहन केले. 

एका व्हिडओ द्वारे तातटकरे यांना निवडून देण्याचे अवहान करताना शिंदे म्हणाले की, यंदा असलेली लोकसभा निवडणूक ही कोणत्या व्यक्तीची नाही तर देशाचे  नेतृत्व निवडण्याची निवडणूक आहे. जगभरात आपल्या देशाचे नाव रोशन करणारी ही निवडणूक आहे.  रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे हाडाचे कार्यकर्ते असून त्यांनी नेहमीच आपल्या लोकसभा मतदारसंघात जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्याशी जनसंपर्क ठेवलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना जनतेने मतदान करावं असं मी आवाहन करतो.

रायगड लोकसभा मतदारसंघात यापूर्वी ए. आर.  अंतुले साहेबांनी फार मोठे काम केले आहे , त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हा त्यांचा पट्टशिष्य आता पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभा राहिला आहे. खासदार असताना केलेली त्यांची विकास कामे हे त्यांच्या कामाची पावती देतात. सर्वसामान्य कार्यकर्ता आणि सर्वसामान्य जनतेचा नेता अशी सुनील तटकरे यांची ओळख आहे. गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारने केलेली काम आणि महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारने रायगड लोकसभा मतदारसंघात केलेली काम यांना सुनील तटकरे यांच्या कामाची जोड आहे. येणाऱ्या ७ तारखेला सुनील तटकरे यांच्या नावासमोरील घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून जनतेने त्यांना निवडून आणावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments