महाड विधानसभा मतदार संघातील पोलादपूर तालुक्यातील ६७ मतदान केंद्रवर ७ मे रोजी झालेल्या ३२ रायगड लोकसभा मतदान साठी ४२ हजार २३५ मतदार पैकी २३ हजार ३४९ मतदारांनी हक्क बजावत लोकशाही च्या या उत्साहात सहभागी झाले तालुक्यात ५५ टक्के मतदान झाले असून गेल्या निवडणूक पेक्षा २ टक्के ने मतदान कमी झाले आहे. गेल्या लोकसभेला ४२३९६ पैकी २३८६७ मतदान झाले होते ,अनेक नावे नसल्याने तसेच बाहेर गावी असणारे मतदार न आल्याने त्याच प्रमाणे गावातील काही मतदार बाहेरगावी पर्यटण साठी गेल्यान टक्केवारी कमी होत असल्याचे गेल्या अनेक निवडणूक दरम्यान दिसून आले आहे .
निवडणूक आयोगाने गावागावात जनजागृती सह मतदान महत्व पुन्हा एकदा नव्याने पटवून देत मतदान सक्तिचे करणे गरजेचे बनले आहे. महाड विधानसभा मतदारसंघात पोलादपूर तालुक्यात २ जिल्हा परिषद व ४ पंचायत समिती,१ नगर पंचायत मतदार संघ असून तालुक्यातील ग्रामीण भागात ३६ हजार ७३५ मतदार तर नगरपंचायत हद्दीत ५ हजार ५१० मतदार असे ४२ हजार २३५ मतदार आहेत या मध्ये २० हजार ७६७ पुरुष मतदार तर २१४६८ स्त्री मतदार आहेत स्त्री मतदारांची संख्या अधिक असली तरी मतपेटीत पुरुष मतदारांची संख्या अधिक दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक मध्ये ६७ मतदान केंद्र वर २३ हजार ३४९ मतदान झाले आहे या मध्ये ११ हजार ८३५ पुरुष तर ११ हजार ५०४ स्त्री मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मध्ये नगरपंचायत हद्दीतील ६ मतदान केंद्रावर ५ हजार ५१० पैकी ३ हजार ९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलं आहे
पोलादपूर मध्ये नगर पंचायत वर शिंदे गट शिवसेना चे वर्चस्व आहे तर पंचायत समिती वर या पूर्वी काँग्रेस आघाडी चे वर्चस्व होते तर जिल्हा परिषद वर १ शिवसेना व १ आघाडी असे समीकरण होते सद्य स्थितीत जिल्हापरिषद सह पंचायत समिती वर प्रशासक असल्याने तालुक्यातील लोकसभेला झालेलं मतदान आगामी विधानसभा निवडणूक सह जिल्हा परिषद सह पंचायत समिती चे मताधिक्य बदलणारे ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments