तालुक्यातील महाळगुर येथील एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना ०२ मे २०२४ रोजी पोलादपूर एसटी स्थानकामध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३८९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ मे २०२४ रोजी पावणेचार वाजण्याच्या सुमारास सुलोचना सिताराम घाडगे(वय ६८ वर्षे, रा. महालगुर, पोलादपूर) यांच्या हातातील तीन तोळ्याच्या दोन बांगड्या एसटी बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने हातातून ओढून लंपास केल्या. या तीन तोळा बांगड्यांची किंमत अंदाजे ४५,००० रुपये नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संग्राम बामणे हे अधिक तपास करत आहेत.
Post a Comment
0 Comments