Type Here to Get Search Results !

काशीबाई नवले रुग्णालय ठरतंय रुग्णांसाठी वरदानविविध योजनांच्या माध्यमातून रुग्णांना मिळतात मुबलक दरात उपचार

काशीबाई नवले रुग्णालय ठरतंय रुग्णांसाठी वरदान
विविध योजनांच्या माध्यमातून रुग्णांना मिळतात मुबलक दरात उपचार

हवेली वार्ताहर
   पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणारे काशीबाई नवले रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरत असून या रुग्णालयातून उपचार घेऊन अनेक गंभीर आजारांवर रुग्णांनी मात केली आहे. काशीबाई नवले रुग्णालयातून शहरी गरीब योजना पुणे महानगरपालिका, महात्मा ज्योतिराव फुले योजना, राजीव गांधी योजना, संजय गांधी योजना यांच्या माध्यमातून एप्रिल २०२३ ते मे २०२४ या कालावधीत १९४४ रुग्णांनी या योजनांमधून लाभ घेऊन काशीबाई नवले रुग्णालयामधून उपचार घेऊन घरी परतले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना कोणत्या योजनेमधून सवलत मिळू शकते याबाबतचे मार्गदर्शन डॉ मधुकर जगताप हे पेशंटच्या नातेवाईकांना चांगल्या प्रकारे सल्ला देऊन योजनेचा लाभ मिळवून देतात. अशा योजनेचा लाभ गोरगरिबांना मिळुन आणि चांगले उपचार देऊन रुग्ण काशीबाई नवले रुग्णालयातून बरे होऊन घरी परतत आहेत.
       डायरेक्टर अरविंद भोरे, MJPJAY प्रमुख मधुकर जगताप यांच्यामार्फत नवले रुग्णालयात आलेल्या पेशंटला चांगली ट्रीटमेंट मिळावी म्हणून यासाठी प्रयत्नशील असतात.

Post a Comment

0 Comments