रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होत आहे. आता उमेदवारांना प्रचार करण्यासाठी काहीच दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. अशातच रायगड लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरदार सुरू आहेत. यातच मशिदीत नमाज पाडणारे दलाल आहेत, असे द्वेष पसरवणार्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते. जाणीवपूर्वक द्वेष पसरवू नका. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप करु नका, अस म्हणत सुनील तटकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांनी एका प्रचार सभेत तटकरे यांच्यावर टिका केली. त्यावर आता तटकरेंनी पलटवार केलाय.
यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, "ज्या मतदारसंघात मातोश्री आहे, ज्या मतदारसंघात उबाठा गटाचे नेतृत्व राहते. त्या मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे पंजावर मतदान करणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याची वेळ येईल, तेव्हा चार अक्षरांची शिवसेना हे दुकान बंद करेन असे जाहिरपणे सांगितले होते. पण आज काय अवस्था आहे, बघा! २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या सोळाव्या राउंडला अनंत गीते बाहेर निघून गेले होते. ४ जूनला लागणार्या निवडणूकीच्या निकालावेळी अनंत गीते तिसऱ्या राउंडला बाहेर जाताना दिसले पाहिजे असे काम करा.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून तटकरे यांच्या मतदारसंघात जाहीर सभा पार पडत आहेत. सुनील तटकरे यांना यंदा महायुतीची भक्कम साथ मिळत आहेत. तसेच सभांना देखील महायुतीचे सर्वच नेते उपस्थित राहत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या ०४ जूनला सुनील तटकरे पुन्हा गुलाल उधळणार का ? याची प्रतिक्षा आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.
Post a Comment
0 Comments