पोलादपूर वार्ताहर
पोलादपूर तालुक्यातील चरई गावचे ग्रामदैवत असणाऱ्या गावदेवी जननी मातेचा शिमगोत्सव, दसरा यांसह चरई ग्रामदैवतेचे अनेक उत्सव हे वर्षभरात मोठ्या उत्साहात व थाटात साजरे केले जातात. पोलादपूर येथील भैरी जोगेश्वरी काळभैरवनाथ जत्रोत्सवात देखील प्रतिवर्षी चरई गावच्या ग्रामदैवत भैरी जोगेश्वरी काळभैरवनाथाच्या भेटीला जात असते. उंचच उंच सासण काठी,आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजवलेली पालखी भक्तगण नाचत जत्रोत्सवात नेतात. हे सर्व दृश्य डोळ्यांचे पारडे फेडणारे असतात. जागृत देवस्थान अशी ओळख असणाऱ्या जननी मातेच्या देवस्थान समितीची निवड प्रति दोन वर्षांनी सर्वानुमते केली जाते. यंदा याच देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी मा. पंचायत समिती सदस्य यशवंत भिकू कासार, उपाध्यक्ष पदी प्रकाश प्रेमनाथ निकम, सचिव पदी संदिप संतोष जाबडे तर खजिनदार पदी जानू महादेव सुतार यासोबतच कार्यकारिणी सदस्य पदावर प्रत्येक वाडीतून दोन सभासदांची निवड १७ मे २०२४ रोजी जननी मातेच्या सहाणेवर झालेल्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली. यावेळी मा. अध्यक्ष राजू सुतार, मा. उपाध्यक्ष किसन कुर्डे, मा. सचिव अरुण साळवी यांचे देखील ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.
देवस्थान समिती आयोजित बैठकीस सरपंच संदेश कासार, मा. पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, मा. उपाध्यक्ष किसन कुर्डे, मा. सचिव अरुण साळवी, खजिनदार जानू सुतार, चंद्रकांत सुतार, मोहन निकम, प्रकाश कासार, राहुल गायकवाड, नासीर मजगणकर, सचिन चिनके, भरत तांबे, प्रकाश निकम,संदिप जाबडे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments